पीक विमा योजनेसाठी रायगडात जनजागृती

| उरण | वार्ताहर |
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी कृषी विभागाच्यावतीने  रायगड जिल्ह्यात जनजागृती मोहीम सुुरु करण्यात आली आहे. कृषी उपसंचालक कृषी जिल्हा रायगड  दत्तात्रय काळभोर यांच्या हस्ते   प्रचार प्रसिद्धी रथास  हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
 

उरण तालुक्यामध्ये  या योजनेचा  प्रचार आणि प्रसिद्धी व्हावी यासाठी  हा रथ फिरविण्यात आला.  यावेळी उपस्थित तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्यासह  तालुका पीक विमा प्रतिनिधी उपस्थित होते.  खरीप हंगाम 2022-23 करिता उरण तालुक्यामध्ये भात या पिकासाठी राबवत आहे. या योजनेत सहभागी होण्याची मुदत 31 जुलै 2022 असून त्याला अवघे 4  दिवसाचा कालावधी शिल्लक असल्याने जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या योजनेत सहभागी व्हावे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version