युवानेते योगेश शिर्के यांचा शेकापत जाहीर प्रवेश
| माणगाव | ( सलीम शेख )|
माणगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण अशा ओळखल्या जाणाऱ्या खरवली ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे. या खरवली ग्रामपंचायतीच्या निवडणुक धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला असून खरवली गावचे सुपुत्र युवानेते योगेश यशवंत शिर्के यांनी राष्ट्रवादी पक्षातून माणगाव येथे तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या निवासस्थानी शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी शेकापचे ज्येष्ठ नेते अस्लमभाई राऊत व तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या विशेष उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी योगेश शिर्के यांचे अस्लम राऊत व रमेश मोरे यांनी पक्षात स्वागत केले.
यावेळी मार्गदर्शन करताना तालुका चिटणीस रमेश मोरे म्हणाले की खरवली गावचे सुपुत्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योगेश यशवंत शिर्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन शेकापमध्ये प्रवेश केला आहे. त्यांची खरवली गावात मोठी ताकद असुन तरुणांचे ते स्फूर्ती स्थान म्हणून ओळखले जातात. गावात त्यांचे सर्वांशी चांगले ऋणानुबंधाचे संबंध असल्याने त्यांच्या रूपाने शेकापला मोठी ताकद मिळाली असून खरवली ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रभाग क्रमांक १ मधून शेकापचा उमेदवार म्हणून त्यांचे नाव घोषित करीत असल्याने रमेश मोरे यांनी सांगितले. या पक्ष प्रवेश कार्यक्रमास युवानेते स्वप्निल दसवते, अँड.मुसद्दिक राऊत, खरवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नथुराम अडीत, योगेश मोरे आदी उपस्थित होते.
