। पनवेल । प्रतिनिधी ।
खारघर येथील शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तथा मावळ लोकसभा समन्वयक केसरीनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केलेल्या कॉलनी फोरम अध्यक्षा लीनाताई गरड, मधू पाटील, कामोठे कॉलनी फोरम अध्यक्ष मंगेश आढाव, मनोज सोमवंशी, मनसेचे माजी जिल्हाउपाध्यक्ष अॅड. प्रशांत अनगुडे यांचा सत्कार समारंभ व सुसंवाद मेळावा खारघर येथे पार पडला.खारघर फोरम ही संस्था शिवसेना पक्षात आल्यामुळे पनवेल विधानसभेमध्ये शिवसेनेची ताकद निश्चितपणे वाढेल. आणि त्याचा फायदा येत्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वाघेरे यांना होईल असे केसरीनाथ पाटील यांनी सांगितले.