। उरण । वार्ताहर ।
उच्च शिक्षणातील सर्वोच्च संस्था असलेल्या ”इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी”, इंदोर या नामांकित संस्थेत गेट परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने श्रुती संदीप घोडके या विद्यार्थिनीचे रयत सेवक बँकेच्या माध्यमातून जाहीर सत्कार करण्यात आला. कुमारी श्रुती घोडके हिचा यापूर्वी रयत बँकेने दहावी परीक्षेत 96 टक्के गुण मिळवल्या बद्दल पुणे येथे तर तिचा भाऊ अथर्व घोडके याने बारावी परीक्षेत 94 टक्के गुण मिळवल्याबद्दल पनवेल येथे सन्मानकरण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी डॉ.जे.जी. जाधव, बंडू पवार व किशोर पाटील यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरानी व रयत परिवाराने श्रुती घोडके हिचे हार्दिक अभिनंदन करून तिला तिच्या पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.






