| महाड | प्रतिनिधी |
महाड नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका पूजा गोविलकर यांनी आपल्या प्रभागातील चवदार तळ्यांच्या काठावर असलेल्या झाडांवर बगळ्यांचे वास्तव्य असून, या बगळ्यांची विष्ठा चवदार तळ्यातील रस्त्यावर पडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, असे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
चवदार तळ्याच्या काठावर असलेली झाडे जर अशाच अवस्थेत ठेवली तर चवदार तळे सत्यग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त चवदार तळ्यातील पाणी शुध्द व्हावे. यासाठी केली जाणारी ओझोन ट्रिटमेंट व चवदार तळे परिसर सौंदर्यीकरण यावर शासनाकडून जो करोडो रुपये खर्च केला जातोय तो या बगळ्यांच्या विष्ठेमुळे माती मोल होईल त्यामुळे चवदार तवळव्याच्या काठावर जी झाडे उंच वाढली आहेत ती बुंध्यापासून न तोडता त्यांच्या फांद्या व त्यांची उंची शक्य तितकी कमी करावी, अशी मागणी नगरसेविका पूजा गोविलकर यांनी नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांचेकडे केली.
या संदर्भात पक्षीमित्रांशी चर्चा केली असता या बगळ्यांचा प्रजनन काळ संपला असून, या झाडांवर जी दोन-चार घरटी आहेत. ती ही कमी होतील असे सांगितल्यांचे गोविलकर यांनी म्हटले. या बगळ्यांमुळें नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्यांचे पत्र अशोक मोरे यांनीही दिले, असल्याचे गोविलकर यांनी सांगत या बाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी केली. गोमुखी आळी परिसरातील विकास वैद्य यांची पत्नी यांनाही या विष्ठेमुळे श्वसनाचा त्रास झाला होता त्यांना उपचारासाठी दोन वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते हे सभागृहांचे निदर्शनास आणून दिले.
पक्षांच्या विष्ठेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
