वैद्यकीय कचरा निवारण एस.एम.एस.एन ओल्वीन प्रा.लि.कंपनीसाठी पुन्हा १७ नोव्हेंबरला जनसुनावणी 

तर जनसुनावणी बेकायदेशीर असल्याची ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया

 खोपोली | प्रतिनिधी |

रूग्णालयातील जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणारा एसएमएस नावाचा कारखाना आत्करगांव येथे येेेेवू घातला असून जैविक कचऱ्यामुळे परिसरात प्रदुषण होत नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत अनेक अजारांमुळे जिवणमान कमी होणार असल्याची भिती व्यक्त केली आहे. त्यामुळे हा कारखाना सुरू होवू नये यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला ग्रामसभेत ठराव मंजूर केल्यावर दि. १३ ऑगस्ट २०२१ रोजी लावलेली बेकायदेशीर जन सुनावणी लावण्यात आली होत. दि. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी खोपोली, खालापूर येथे जनसुनावणी लावली आहे. ही सुनावणी पंचक्रोशी विभागातील नागरिकांच्या मते बेकायदेशीर असल्याचे निवेदनपत्र जिल्हाधिकारी यांच्या देण्यात आले आहे.       

खालापूर तालुक्यातील आत्करगांव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स.नं-२३१ मधील जागेत एस.एम.एस.एन ओल्वीन प्रा.लि.कंपनी जैव वैद्यकीय कचरा निवारण प्रकल्पासाठी खरेदी करीत आहेत. यासाठी ग्रुप ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला घेतला होता.सदर जागेपासून २०० मी अंतरावर गाव नदी तसेच ५०० मी अंतरावर पाझर तलाव, आत्करगांव, आडोशी, चिंचवली,टेंबेवाडी,होनाड,कुंभेवाडी,आत्करगांव वाडी,बौध्दवाडा,जंगमवाडी जैविक प्रकल्प उभारल्यास कुजलेल्या कचऱ्यामुळे हवा दुषित होवून दुर्गधी पसरले,तसेच जंतू पाण्यात मिसळल्यास नदी तलाव दुषित होवून नदीवरील पाणी योजना दुषित होत

साथीचे आजारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो.त्यामुळे ग्रामस्थांनी विरोध दर्शविताच दि. १६ मार्च २०२० रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती. यादरम्यान ग्रामस्थांनी विरोध केल्यावर ना हरकत दाखला रद्द करण्याचा ठराव घेण्यात आल्यावर साजगांव पंचक्रोशीतील पाच ग्रामपंचायतीचा विरोध असतानाही दि.१३ आँगस्ट रोजीची जनसुनाणी रद्द करण्यात आली आणि नागरिकांनी जल्लोष साजरा केला परंतु पुन्हा दि.१७ नोव्हेंबर जनसुनावणी जाहिर होताच राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष शिवाजी पाटील,शेकाप खालापूर तालुका चिटणीस संदीप पाटील,माजी सदस्य चंद्रकांत देशमुख,मा.उपसरपंच तसेच विद्यमान सदस्य समीर देशमुख,मनोहर शिंदे,वसंत पाटील यांनी आक्रामक पवित्रा घेत जिल्हाधिकारी,खासदार स्थानिक आमदार,एम. पी.सी.बी.एम. एस. आर. डी. सी.तहसिलदार खालापूर, गटविकास अधिकारी खालापूरन यांना पत्र व्यवहार करीत १७ नोव्हेंबर रोजीची जनसुनावणी बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे.

Exit mobile version