उद्या पोयनाडमध्ये जाहीर सभा

शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

आंबेपूर जिल्हा परिषद मतदार संघातून शेकाप महाविकास आघाडीच्या उमेदवार पूजा अजित भगत, आंबेपूर पंचायत समिती मतदार संघातून शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चंद्रकांत म्हात्रे तसेच रुईशेत भोमोली पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार रुपेश उघडा यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि.4) सायंकाळी साडेपाच वाजता, पोयनाडमध्ये हिरू दलाल नगर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे आदी मान्यवरांसह शेकाप व महाविकास आघाडीतील वेगवेगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version