| खांब-रोहा | वार्ताहर |
कुणबी समाजोन्नती संघ मुंबईच्यां सहकार्याने कुणबी राजकिय संघटन समितीची महत्त्वाची जाहीर सभा कुणबी जोडो अभियान रविवार, दि. 18 सप्टें रोजी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, गावस्कर सभागृह, शारदा सिनेमा जवळ, दादर पूर्व मुंबई-14 येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. विशेष म्हणजे, मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतानादेखील समाज बांधवांनी फार मोठी उपस्थिती नोंदविली होती.
यावेळी संघाचे अध्यक्ष भूषण बरे, समितीचे अध्यक्ष अशोक वालम, अविनाश लाड, संघाचे उपाध्यक्ष सदानंद काष्टे, सरचिटणीस अरविंद डाफळे, सहसचिव अशोक करंजे, हरिश्चंद्र म्हातले, समिती सरचिटणीस नंदकुमार मोहिते, प्रकाश तरळ, माधव कांबळे, सुवर्णा पाटील, दिपीका आग्रे, दौलतराव पोष्टुरेर, रवींद मटकर, शंकरराव कांगणे, संघ तालुका शाखा पदाधिकारी उपास्थित होते.
कुणबी जोडो अभियान अंतर्गत जाहीर सभा
