| आगरदांडा | वार्ताहर |
बॅरिस्टर अंतुले साहेब यांनी खर्या अर्थाने गरिबांची सेवा केली.मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री असताना अनेक लोकाभिमुख योजना राबवून ते जनतेच्या मनातले ताईत बनले. लोकांच्या उपयोगी पडणारे काम हीच खरी लोकसेवा आहे,असे प्रतिपादन काँग्रेस नेेते मुश्ताक अंतुले यांनी केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अ.र.अंतुले यांच्या स्मृतीदिनी स्मुर्ती दिनानिमित्ताने मुरुड येथील वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय व क्रिस्टल आय सेंटर माझगाव मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी,सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर डॉ.अनिस भावनगरवाला,प्राचार्य डॉक्टर एम.ए.नगरबावडी,उप प्राचार्य डॉ.विश्वास चव्हाण, आर.सी.घरत, श्रद्धा ठाकूर,सुभाष महाडिक, स्नेहा पाटील, स्मीता खेडेकर,वासंती उमरोटकर,सुभाष महाडिक,महेंद्र चौलकर,इस्माईल शेख,चिंतामणी मकु,पनवेल शहर अध्यक्ष अभिजित पाटील,इरफान हलडे,माजी तहसीलदार नयन कर्णिक, डॉ.मधुकर वेदपाठक, डॉ.सुभाष म्हात्रे, डॉ.मुरलीधर गायकवाड, डॉ.श्रीशैल बहिरगुंडे, डॉ.जनार्दन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अभिजित पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सदरील मोफत नेत्र तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. एकदरा ,राजपुरी,मुरुड शहर,नांदगाव,मजगाव,उसरोली,आदी भागातून लोकांनी या शिबिरासाठी मोठी गर्दी केली होती.सुमारे 750 लोकांपेक्षा जास्त लोकांनी डोळे तपासून चष्मे व मोफत इलाज केला गेला.तर काही जणाना शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथे पाठवण्यात येणार आहे. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाईक महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
सेवा ही निरपेक्ष असावी. जे कार्य बॅरिस्टर अंतुले यांनी केले त्याच कार्यपद्धतीने आगामी काळात शैक्षणिक सुविधा देण्याबरोबरच लोकांना उपयोगी पडणारी आरोग्य सेवा पुरविण्याकडे आमचा कल राहणार आहे. श्रीवर्धन,म्हसळा व मुरुड या ठिकाणी आरोग्य विषयक शिबिरे घेणार
मुश्ताक अंतुले,काँग्रेस नेते