शिवकालीन दिनविशेष पुस्तकाचे प्रकाशन

। कर्जत । प्रतिनिधी ।
संजय वझरेकर लिखित शिवकालीन दिनविशेष या पुस्तकाचे प्रकाशन कर्जतमध्ये करण्यात आले. संजय वझरेकर यांचे दिनविशेष या स्वरूपाचे हे सातवे पुस्तक आहे, याआधी त्यांचे तारखेत काय अर्थात तारखांचे मानकरी भाग एक दोन, टर्निंग पॉईंट, गाथा क्रांतीवीरांची, साहित्यिकांची मांदियाळी, पर्यावरणीय दिनविशेष अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

कर्जत येथील लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय या ऐतिहासिक वास्तूमध्ये एका छोट्याखाली कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या पुस्तकाचे प्रकाशन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेविका खुशबू चौधरी यांच्या शुभहस्ते आणि कर्जत नगरपरिषद नगराध्यक्ष सुवर्ण जोशी यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले,. याप्रसंगी लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष दीपक बेहेरे, चिटणीस सुचिता जोगळेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुचिता जोगळेकर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत आणि त्यांचा परिचय लेखक संजय वझरेकर यांनी करून दिला. तर पुस्तकाचा परिचय लेखिका मृदुला गडनिस यांनी केला. या कार्यक्रमास साहित्यिक दिलीप गडकरी, कृषी विभागाचे संशोधक रविंद्र मर्दाने, रिलायन्स फाउंडेशनच्या विज्ञान शिक्षिका वैष्णवी मोडक, मिलिंद मोहिते, महेश होनावर, प्रशांत जगताप, मंगेश वझरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version