| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मुरुडच्यावतीने मुरुडचा युवा गझलकार योगेश दवटे यांच्या ‘राधिका’ या गझलसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध गझलगायक गझलनवाज भिमराव पांचाळे यांचे हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी कोमसाप रायगड जिल्हा अध्यक्ष सुधीर शेठ, अ.वि. जंगम, दिपाली दिवेकर, संध्या दिवकर, डॉ. रविंद्र नामजोशी, सुबोध साने, संजय गुंजाळ, सिद्धेश लखमदे व योगेशचे आई-वडील उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरुड शाखा अध्यक्ष संजय गुंजाळ यांनी केले. या गझलसंग्रहाचे प्रकाशन राज्ञा दवटे हिने राधिकेच्या वेशभूषेत एका मडक्यातून गझलसंग्रहाच्या प्रती आणून अनोख्या पद्धतीने करण्यात आले. प्रमुख पाहुणे गझल नवाज भिमराव पांचाळे यांनी गझल कशी सूचते, गझलेला संगीत देण्याची प्रक्रिया कशी घडते, हे स्पष्ट करुन योगेशच्या गझलसंग्रहाचे कौतुक केले. तसेच, त्याची एक गझल सुरमयी स्वरात सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. भिमरावांची सुकन्या बागेश्री पांचाळे हिनेही सुंदर गझलांचे गायन करुन कार्यक्रम सांगितिक उंचीवर नेला. प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर यांनी राधिका या गझलसंग्रहाचे रसग्रहण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हेमंत बारटक्के यांनी केले.