| वाघ्रण | वार्ताहर |
वाघ्रण येथील नाट्य अभिनेते सेवादल कार्यकर्ते निवृत प्राथमिक शिक्षक कै. अनंत जगू पाटील यांचे जीवनावर आधारीत विजय अनंत पाटील लीखीत अनंत आठवणी या आतकथा पुस्तकाचे प्रकाशन जेष्ठ कवी अरुण म्हागे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. मोहन पाटील, कवी चंदने, कवी संकेत म्हात्रे , तुलसीदास पवार, विजय पाटील, दिपक यशवंत पाटील आदी मान्यवर उपस्थीत होते.
पुस्तकाला प्रस्तावना अरुण म्हात्रे यांची असून मुखपृष्ठ तरुण चित्रकार प्रथमेष म्हात्रे यांनी केले आहे. या प्रकाशन सोहळ्यात गायन आणि कवीता वाचन झाले तर व्यासपीठावर उपस्थीतांस ह राजन पाटील अनिल पाटील आदींची मनोगते झाली कार्यक्रमम वाघ्रण गावांतील आणि मुंबईतील वाघ्रणकर यांच्या सोबत अनेक मित्र नातेवाईक उपस्थित होते. सूत्रसंचलन सुचित ठाकूर यांनी केले.





