‘एका’ कादंबरी, ‘पैंजण’ कथासंग्रहाचे प्रकाशन

| मुंबई | प्रतिनिधी |

सिंगापूर निवासी लेखिका मोहना कारखानीस लिखित ‘एका’ ही कादंबरी आणि ‘जाईचा मांडव’ व ‘पैंजण’ या कथासंग्रहांच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन असा संयुक्त कार्यक्रम ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला.
कांदिवली (पूर्व )ठाकूर व्हिलेज येथील एव्हर शाईन हॉल या ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री दामले यांनी केले. ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ अध्यक्षस्थानी असलेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मीना नाईक, प्राध्यापिका जाई म्हात्रे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रय सैतवडेकर तसेच डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे आदी उपस्थित होते.

स्त्री जीवनाच्या संघर्ष कथेवर आधारित ‘एका’ कादंबरीची प्रस्तावना महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या मराठी विषयाच्या प्राध्यापिका जाई म्हात्रे यांनी केली असून, कादंबरी विषयीची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाची सांगता संजय कारखानीस यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. याप्रसंगी मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली.

Exit mobile version