। श्रीवर्धन । वार्ताहर ।
कोकण मराठी साहित्य परिषद खोपोली आणि ज्येष्ठ नागरिक सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ‘येताना तू नकळत ये’ या गझल संग्रहाचा प्रकाशन ए.के.शेख यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमास उल्हासराव देशमुख, सुखलाल चौधरी, डॉ. प्रदीप पाटील, यशवंत सकपाळ, सूर्यकांत देशमुख, महादेव सूर्यवंशी, पिंगळे गुरुजी, कोमसापचे व ज्येष्ठ नागरिक सभेचे सभासद, खोपोलीतील डॉक्टर मंडळी, पत्रकार व गजलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन ससाणे यांनी केले तर आभार नरेंद्र हर्डीकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजोपाध्ये, वामनराव दिघे, संतोष वाघ, सुधाकर चव्हाण, अनिलकुमार रानडे, जयश्री पोळ, प्रकाश सोनवणे, मधुमिता पाटील आदिंनी खूप परिश्रम घेतले.