मधु मंगेश कर्णिक यांच्या कादंबरीचे ठाण्यात प्रकाशन

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या प्राप्तकाल या कादंबरीचे प्रकाशन नुकतेच ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे डॉ.भालचंद्र मुणगेकर, खा.संजय राऊत, जयू भाटकर यांच्या हस्ते झाले. याच कार्यक्रमात महाडच्या भारती शरद मेहता यांच्या सुटका या लघु कादंबरीचे प्रकाशनही कर्णिक यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला महाडहून शोभा सावंत, सुधीर शेठ, अ.वि.जंगम, नरेंद्र महाडिक, संजय शेट, अशोक हेमचंद्र मेहता, किरण लोहार हे उपस्थित होते. सोहळ्याचे सूत्रसंचालन कोमसापचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ यांनी केले. या कार्यक्रमाचे नमिता किर, प्रदीप ढवण, अरुण नेरुरकर आदी कोमसापाच्या पदाधिकार्‍यांनी उत्तम नियोजन केले होते.

Exit mobile version