मैत्रांगण पुस्तकाचे प्रकाशन

। कोर्लई । वार्ताहर ।

जंजिरा विद्या मंडळ संचलित मुरुडच्या सर एस.ए. हायस्कूल सन 1972-73 बॅचतर्फे मैत्रांगण या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पनवेल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी अनिल पुलेकर यांनी प्रास्ताविक केले तर आनंद रणदिवे यांनी मैत्रांगण पुस्तकाची जडणघडण कशी झाली याबाबत भाष्य केले. त्यानंतर अमेरिकन निवासी वर्ग मित्र डॉक्टर किशोर मेहता यांच्या हस्ते ”मैत्रांगण” पुस्तक प्रकाशन संपन्न झाला. यावेळी अविनाश साळी यांनी मैत्रांगण पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी वर्गमित्र डॉ. गिरीश सबनीस, डॉ. किशोर मेहता, आनंद रणदिवे, सुनील प्रधान, सुरेन करंबे, अलका पालवणकर, अनिल पुलेकर, वासंती हणमंते, राम भोसले, जया ठाकूर नंदकुमार भगत, विनोद भगत, कुमार खोत, वर्षा बागवे, कुंदा चाफीलकर, नैनीता कर्णिक, जगदिश वोरा यांच्या सहभागातून हा कार्यक्रम यशस्वी झाला याबद्दल आभार मानले.

Exit mobile version