‘नवरा माझ्या मुठीत गं’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

| श्रीवर्धन | वार्ताहर |

खोपोलीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुभाष कटकदौंड लिखित ‘नवरा माझ्या मुठीत गं’ हा विनोदी काव्यसंग्रह आणि माणुसकी हीच खरी जात ही एकांकिका, अशा दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा खोपोली बुज हास्य परिवाराचे संस्थापक बाबुभाई ओसवाल यांच्या हस्ते मकरसंक्रांतीच्या दिवशी लोहाणा समाज हॉल, खोपोली येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुज हास्य परिवाराचे प्रभारी अध्यक्ष विजय घोसाळकर यांनी केले. बुज हास्य परिवार आयोजित या कार्यक्रमात उज्वला दिघे, अध्यक्ष, को.म.सा.प. खोपोली आणि अनिलकुमार रानडे, ज्येष्ठ कवी, अध्यक्ष-ब्राम्हण सभा, खोपोली हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

दोन्ही पुस्तकांचे लेखक असलेल्या डॉ. सुभाष कटकदौंड यांच्याविषयी गौरवोद्गार काढत बाबुभाई ओसवाल म्हणाले की, वैद्यकीय व्यवसायात असूनदेखील डॉक्टरांचे साहित्यिक योगदान उल्लेखनीय आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. शोभाताई धायगुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जनार्दन सताणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष वाघ, सावित्रीबाई जाधव, पंकज दुर्गे, दीपक मालुसरे, अंबादास पाठक, हेमंत नांदे, साहेबा गायकवाड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास राजीवभाई ओसवाल, डॉ. घनशाम आठवले, डॉ. दर्शन आवस्कर, डॉ. प्रसाद पाटील, डॉ. राहुल वीर, डॉ. अमोल गोसावी, डॉ. सुनिल देवडीकर, डॉ. सुषमा देवडीकर, डॉ. हेमंत पाटील, दिनकर भुजबळ, यशवंतराव गायकवाड, संजय पाटील, इतर मान्यवर तसेच कोमसाप खोपोली शाखेचे श्री. राज्योपाध्याय, श्री. सर्वोदे, मधुमिता पाटील, महेश निमाणे, जयश्री पोळ, शीतल अहेर, मोहिनी गुरव व पत्रकार बंधू आणि बुज हास्य परिवारातील साधक बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version