| नेरळ | वार्ताहर |
मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर आणि यशवंतराव चव्हाण सेंटर, केंद्र बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवसनिमित्त ‘जागर मराठीचा’या कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा येथे करण्यात आले होते. त्या सोहळ्यात कर्जत येथील कवी पांडुरंग घोलप यांच्या ‘शब्द फुले’ या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले. पुस्तक प्रकाशनानंतर संस्थेच्यावतीने कविवर्य घोलप यांचा शाल, पुष्पगुच्छ, जागर मराठीचा विशेषांक, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी शुभांगी घोलप, संदिप थोरवे, रमेश इंगळे, राधेश्याम चांडक, नरेश शेळके, डॉ. संगीता काळणे-पवार, राहुल पाटील, अरविंद उरकुडे, डॉ. अण्णासाहेब म्हळसणे, रणजितसिंग राजपूत, शंकर महाराज येळगांवकर, विजय गवारगुरू, आदी मान्यवर उपस्थित होते.