। अलिबाग । वार्ताहर ।
‘चला हवा येऊ द्या’ फेम भाऊ कदम व आ. भाई जयंत पाटील यांच्या हस्ते पांडुरंगा लागली रे आस हे आषाढी एकदाशीचे विठ्ठलावरील आधारित या गाण्याचे प्रकाशन करण्यात आले. या गाण्यासाठी राज रमेश धुमाळ यांनी संगीत दिले आहे. हे गाणे रमेश धुमाळ यांनी लिहिले तर मनोहर पाटील यांनी हे स्वरबध्द केले आहे. संपूर्ण गाणे राज रेकॉर्डिंग स्टुडीओमध्ये केले. गायक म्हणून केतन धुमाळ, लंकेश पाटील, आदित्य सोनवटकर, निहार दिवकर, नयन कीलेकर, वंश साळुंके, विनय नवरे, ऋषी दिवकर यांनी आवाज दिला आहे. संपूर्ण गाण्याचे संकलन तनय संजय जाधव ह्याने केले आहे. आता पर्यंत राज धुमाळ यांनी अनेक गाणी संगीतबध्द केली आहेत.