रायगड मित्र दिवाळी अंकाचे प्रकाशन

पंडीत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
। वाघ्रण । वार्ताहर ।
मंगळवार दि. 2 नोव्हेंबर रोजी पेझारी येथे सकाळी 10 वाजता रायगड मित्र दिवाळी अंक 2021 चा प्रकाशन सोहळा माजी आमदार शेकाप नेते पंडित पाटील व राजिप सदस्या भावना पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडले.
या अंकाचे संपादक दिपक पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले तसेच यावेळी बोलत असताना रायगड मित्र दिवाळी अंकाचे हे तेरावे वर्ष असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच जिवन पाटील, जिविता पाटील, किशोर पाटील, राजेंद्र पाटील, मुरलीधर पाटील आणि श्रीकांत पाटील यांचे विशेष आभार मानले.
सदर कार्यक्रमास वाघ्रण ग्रामपंचायत सदस्य हरिश्‍चंद्र पाटील, गौतम पाटील, राजिपचे प्रमोद, अ‍ॅड. आस्वाद पाटील, मिना म्हात्रे, विवेक पाटील, दयानंद म्हात्रे, संजय पाटील, अ‍ॅड. कृष्णकांत पाटील, गिरीश पाटील, नितेश पाटील, प्रज्वल पाटील, क्षितीज पाटील, राजन म्हात्रे, पेडांबे तंटामुक्त अध्यक्ष रूपेश पाटील, अजित पाटील, अनिल पाटील व पेझारी, पोयनाड परिसरातून अनेक जणांनी दाद दिली.

Exit mobile version