पोलादपूर येथे शकुन काव्यसंग्रहाचे प्रकाशन

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
कै.शकुंतला यशवंत देवधर लिखित शकुन या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच पोलादपूर येथील हॉटेल बालाजी च्या सभागृहात पत्रकार, प्राचार्य आनंद जोशी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कवयित्री शर्मिला जोशी,शकुंतला देवधर यांच्या कन्या अरुणा भागवत, भूषण भागवत, शशिकांत तेलंगे,अजित लिमये,आम्रपाली लोणकर, अर्चना बोरकर, हर्षदा बोरकर,अमृता नाईक, रोहन लिमये,सौरभ भाटे,अक्षय पेंडसे, अवधूत तेलंगे, आसावरी केणी,अरुंधती पाळंदे आदि परिवार सदस्य उपस्थित होते.

यावेळी आनंद जोशी म्हणाले की, .शकुंतला देवधर यांचे पती कै.यशवंत देवधर हे शिक्षण विस्तार अधिकारी होते आणि माझे चांगले स्नेही होते.त्या नात्यानेही हे प्रकाशन करतांना मला विशेष आनंद होत आहे.प्रा.जोशी यांनी आपल्या मनोगतांत आपले काही अनुभव सांगून स्वतःच्या प्रीत पतंगाची या कथा संग्रहातील एक विनोदी कथाही सांगून रसिकांची दाद मिळवली. शर्मिला जोशी यांनी आपल्या मनोगतात भागवत परिवाराने आपल्या दिवंगत आजीचा काव्य संग्रह आठवणीने प्रकाशित करुन आपल्या श्रेष्ठभावना व्यक्त केल्या आहेत असे सांगून या आनंद सोहळ्यावर स्वतः लिहिलेले एक काव्य सादर केले.

अरुणा भागवत यांनी आपल्या दिवंगत आईच्या काही आठवणींना उजाळा दिला.भूषण भागवत, स्वाती भागवत ,अजित भागवत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.प्रकाशनानंतर समस्त भागवत कुटुंबीय ,नातेवाईकांनी काव्य वाचन,नृत्ये,आठवणी सांगणे इ.मनोरंजनाच्या छोटेखानी कार्यक्रमाने अधिक रंगत आणली. सूत्रसंचालन आम्रपाली लोणकर यांनी केले.

Exit mobile version