| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबागमधील वैद्यकिय क्षेत्रातील प्रसिद्ध डॉ. अशिष भगत आणि सातारा येथील डॉ. श्वेता बागडे यांनी लिहिलेल्या तब्बल सात आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये निर्मिती केलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच अलिबागमध्ये पार पडला. अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयोजित ‘आम्माकॉन 2026’ या कार्यक्रमात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील यांच्या हस्ते ‘इन्स्ट्रुमेंट्स इंटेंडेड फॉर द क्यूअर ऑफ सर्जिकल डिसिस’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदशन मिळावे, या उद्देशाने अलिबाग येथील को.ई.स. चंद्रकांत हरी केळुस्कर महाविद्यालयाचे प्राचार्य, होमिओपॅथिक तज्ज्ञ व होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात सर्जरी विषयाचे प्राध्यापक डॉ. आशिष अशोक भगत आणि सातारा येथील सावकार होमिओपॅथीक महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. श्वेता बागडे यांनी ‘इन्स्ट्रुमेंट्स इंटेंडेड फॉर द क्यूअर ऑफ सर्जिकल डिसिस’ या पुस्तकाची निर्मिती केली आहे.







