महामानव या महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन

। अलिबाग । वार्ताहर ।
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील महामानव या महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या दालनात संपन्न झाले. यानिमित्ताने यादव यांनी या महाकाव्य ग्रंथासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या महाकाव्य ग्रंथात 2021 या वर्षाचे निमित्त साधून एकूण 2021महाराष्ट्र मधील कवींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर रचलेल्या 2021 कवितांचा समावेश आहे.या महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात झाले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, प्रा. प्रज्ञा शेटे, कवी सपकाळ, जयपाल पाटील, सुभाष म्हात्रे, महेंद्रकुमार गायकवाड, मधुकर जाधव, कुणाल भोईर, सुजित नांदगावकर हे उपस्थित होते.

Exit mobile version