| नवी दिल्ली | वार्ताहार |
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 ते 11 जूनदरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा सामना खेळविण्यात येणार आहे. दरम्यान, या सामन्यात उपकर्णधारपदाची धुरा चेतेश्वर पुजाराकडे देण्याची घोषणा करण्यात आली आहे. चेतेश्वर पुजाराने याआधी टीम इंडियासाठी ही जबाबदारी पार पाडली आहे.