चेन खेचून चोरटा पसार

| रोहा | प्रतिनिधी |

पहाटे मॉर्निंग वॉक करून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून चोरट्याने पोबारा केल्याची घटना रोहा शहरात घडली आहे. सरस्वती रामजी गुप्ता (58) असे पीडित महिलेचे नाव असून, त्या ब्राह्मण आळी येथील रहिवासी आहेत. त्या शुक्रवार दि.29 मे रोजी पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर चौथ्या मजल्यावर लिफ्टमधून बाहेर पडत असताना चोरट्याने या महिलेच्या गळ्यातील 1 लाख 45 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून तिच्या गळ्यावर वर छातीवर बुक्का मारून पळ काढला. त्यावेळी इमारतीच्या सफाई कामगाराने त्या चोराला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्यालादेखील मारहाण करून चोरटा दुचाकी वरून फरार झाला. याबाबत रोहा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version