। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरूड तालुक्यात रविवार दि.28 जून रोजी पल्स पोलिओ लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपल्या कुटुंबातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व लाभार्थींना दि.28 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जवळच्या लसीकरण बुथवर मुला-मुलींना पोलिओचे डोस पाजण्यासाठी घेऊन जावे. हे लसीकरण बूथ आपल्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, ठराविक शाळा, बस डेपो, सार्वजनिक ठिकाणी, चेक पोस्ट, समुद्रकिनारा इत्यादी ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. तरी या लसीकरण मोहीमेत सहभागी व्हा, असे आवाहन तालुका कृती दल समिती अध्यक्ष मुरुड तथा तहसीलदार मुरुड व सदस्य सचिव तालुका कृती दल समिती मुरुड तथा तालुका आरोग्य अधिकारी मुरुड यांनी केले आहे.
पल्स पोलिओ लसीकरणाचे आयोजन
