पत्रकार सौम्या हत्याकांडात शिक्षा जाहीर

चार आरोपींना दुहेरी जन्मठेप

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

दिल्लीतील साकेत न्यायालयाने 2008 मध्ये पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणातील चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. रवी कपूर, अमित शुक्ला, बलबीर मलिक आणि अजय कुमार यांना या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. यातील पाचवा आरोपी अजय सेठी हत्येप्रकरणी दोषी आढळला नाही, परंतु त्याच्याकडे लुटलेला माल होता. त्यामुळे अजय सेठीला दोषी ठरवण्यात आले. त्याला तीन वर्षाची शिक्षा सुनावली असली तरी तो आधीपासूनच कारागृहात आहे. न्यायालयाने चार आरोपींना दंडही ठोठावला आहे. सर्व दोषींना मकोका अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टाने शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता. चारही आरोपींना दोन प्रकरणात स्वतंत्रपणे जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दिल्लीतील महिला टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन यांची 30 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीतील नेल्सन मंडेला मार्गावर हत्या करण्यात आली होती. सौम्या नाईट शिफ्ट करून कार्यालयातून घरी जात होत्या. पोलिसांना सौम्याचा मृतदेह कारमध्ये सापडला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांना 6 महिने लागले. चारही दोषींना वेगवेगळ्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोन्ही जन्मठेपेची शिक्षा एकामागून एक होणार आहे. हत्येसाठी प्रत्येकी 25 हजार रुपये आणि मकोकासाठी एक लाख रुपये दंड आहे. म्हणजेच चौघांना दुहेरी जन्मठेप आणि 1.25 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Exit mobile version