पंजाबची मुंबई इंडियन्सवर मात

| मुंबई | प्रतिनिधी |

आयपीएल मालिकेतील वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात पंजाबच्या संघाने मुंबई इंडियन्सवर 13 धावांनी मोठा विजय मिळवला. अर्शदीप सिंग पंजाबचा विजयाचा शिल्पकार ठरला. अर्शदीप सिंगने या सामन्यात शेवटच्या षटकात तिसर्‍या आणि चौथ्या चेंडूवर तिलक वर्मा आणि नेहाल वधेरा यांना त्रिफळाचित केले आणि सामना पंजाबच्या नावे केला. मुंबईच्या सर्वच फलंदाजांनी आपली झंझावाती फलंदाजी दाखवून दिली. पण पंजाबचा संघ मात्र वरचढ राहिला. सॅम करन (55), हरप्रीत सिंग(41) आणि जितेश वर्मा (25) यांनी संघाला मिळवून दिलेल्या धावा संघासाठी उपयोगी पडल्या.
मुंबईने दुसर्‍या डावात फलंदाजी करत 6 बाद 201 धावा केल्या. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीने सुरुवात करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी झटपट 4 विकेट्स गमावल्या. पण नंतर प्रभसिमरन आणि अथर्व तायडे सामन्याचा मोर्चा सांभाळला. पण काही षटकात ते दोघेही बाद झाले.

पण नंतर आलेल्या सॅम करन आणि हरप्रीत सिंगने संघाला 200 धावांचा टप्पा गाठण्यात मदत केली. पंजाबचा कर्णधार सॅम करनने 29 चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावले. जितेश शर्माने 4 षटकार लगावत 7 चेंडूत 25 धावा केल्या. या फलंदाजांनी शेवटच्या 5 षटकांत तब्बल 80 अधिक धावा कुटल्या. या मोठ्या खेळींसह पंजाबने 214 धावांचा टप्पा गाठला.

मुंबईकडून ग्रीन आणि चावलाने प्रत्येकी 2 विकेट घेतले तर अर्जुन तेंडुलकर बेहरेनडोर्फ, जॉफ्र आर्चर यांनी प्रत्येकी 1 विकेट मिळवली. अर्जुन तेंडुलकरने आजच्या सामन्यात मुंबईच्या घरच्या मैदानावर पहिली विकेट मिळवली. पण मुंबईची गोलंदाजी संघासाठी भारी पडली. अर्जुन तेंडुलकरच्या एका षटकात पंजाबने सर्वाधिक 31 धावा कुटल्या. ज्याचा संघाला फटका बसला. मुंबईकडून खेळताना संघाचे सलामीवीर ईशान किशा आणि रोहित शर्मा यांनी सुरुवात केली. पण ईशान किशन 1 धाव करत बाद झाला. नंतर रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीनने मुंबईचा डाव सांभाळला आणि झटपट धावा केल्या. पण रोहित शर्मा 44 धावा करत झेलबाद झाला. नंतर ग्रीनने सूर्यकुमार यादवसोबतही झंझावाती खेळी करत संघासाठी धावा जमा केल्या. सूर्याने आजच्या सामन्यात 26 चेंडूत 57 धावांची सहनदार खेळी केली. सूर्या आपल्या फॉर्मात परतल्याने या सामन्यात त्याने दाखवून दिले. तर ग्रीन 67 धावा करत मैदानातून तंबूत परतला. टीम डेव्हिड आणि तिलक वर्मा यांच्या खांद्यावर संघाची धुरा होती. डेव्हिडने षटकार चौकार लगावत सर्वांना आशा मिळवून दिली पण अर्शदीपसिंगने मुंबईच्या अशांवर पाणी फेरलं आणि तिलक वर्मा आणि नेहालवधेराला लागोपाठ त्रिफळाचित केले.

अर्थदीपच्या गोलंदाजीने
30 लाखांचा फटका

या सामन्यात अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी केली पण त्याच्या दोन चेंडूंवर बीसीसीआयला 30 लाख रुपये मोजावे लागले. अर्शदीप सिंगने चार षटकांमध्ये 20 धावा देत चार बळी घेतले. यातील शेवटच्या षटकात त्याने दोन बळी घेतल्या. त्याने षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर टिळक वर्माला बाद केले. चेंडू थेट मधल्या स्टंपला लागला आणि स्टंप मध्येच तुटला. यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने नेहल वढेरालाही त्याच पद्धतीने बाद केले आणि पुन्हा एकदा स्टंपमध्येच तुटला. वास्तविक एलईडी स्टंप आणि जिंग बेल्सच्या सेटची किंमत 30 लाख रुपये आहे. अर्शदीप सिंगने दोन स्टंप तोडल्यामुळे बीसीसीआयला सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान झाले. अर्शदीप सिंगला शेवटच्या षटकात 15 धावांचा बचाव करायचा होता. त्याने अवघ्या 2 धावा देत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हा विजय बीसीसीआयला महागात पडला.

Exit mobile version