| अलिबाग | वार्ताहर |
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमांतर्गत पंचायत समिती अलिबाग शिक्षण विभागामार्फत संचालक मंडळ नागाव हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेत इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विविध शाळांतील 869 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन दिलेल्या विषयावर उत्कृष्ट चित्र रेखाटली. या स्पर्धेत पोयनाड हायस्कूलची विद्यार्थिनी पूर्वा टेमकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
दरम्यान, गटशिक्षणाधिकारी के.आर. पिंगळा यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या. या स्पर्धेला माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत क्रमांक पार्थ गुरव, सेंट मेरी हायस्कूल अलिबाग व तृतीय क्रमांक साईश नाईक रेवदंडा हायस्कूल या विद्यार्थ्यांनी मिळवला. या स्पर्धेत एक्सलंट 10 व सुपेरिअर 35 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गटशिक्षणधिकारी, केंद्रप्रमुख, नागाव हायस्कूलचे मुख्याध्यापक, साधन व्यक्ती, समावेशित शिक्षण साधन व्यक्ती व कला शिक्षकांनी मेहनत घेतली.