प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार

। कोल्हापूर । वृत्तसंस्था ।
प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात आणि शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप दिला. एनडी पाटील यांच्यावर कोल्हापुरातील कसबा बावडा येथील स्मशानभूमित शासकीय इतमामात अत्यंसंस्कार झाले. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी एन.डी. पाटील अमर रहे, अशा भावपूर्ण घोषणांनी निरोप दिला गेला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले.सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिवंगत ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

Exit mobile version