हाशिवरे मध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंडळ यांच्या वतीने सन्मान
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील हाशिवरे येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडळ यांच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख नगरसेविका चित्रलेखा पाटील यांनी कोरोना काळात जनसेवा केल्याबद्दल त्यांना तसेच डॉ आदेश मोकल यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत हाशिवरे देऊलआळी येथे नवीन पाण्याची पाईप लाईन टाकण्यात आली याचे उदघाटन पार पडले. शेकापने ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण केला त्याबद्दल ग्रामस्थांनी धन्यवाद दिले आहेत.
यावेळी वैजाळी ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्या पाटील, माजी सरपंच सिद्धनाथ पाटील, अरुणा पाटील, विजय गावंड, रविंद्र ठाकूर, पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, ज्योती घरत आदी उपस्थित होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, खारेपाटातील विकास कामे होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असून नागरिकांना कोरोनामुक्त करण्यासाठी कोव्हीड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्याचे प्रयत्न करण्यात येतील. तसेच हाशिवरे गावाला 100 मोफत लसी देण्याचेही त्यांनी यावेळी कबूल केलेे. कोरोना काळात खारेपाटीतील जनतेला आरोग्य सेवा देणार्या डॉ आदेश मोकल यांना चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांना टाईम्स ऑफ इंडियाच्या वतीने ईटी इंस्पायरिंग वुमन अवॉर्डने गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान सरपंच संध्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विजय गावंड, सिद्धानाथ पाटील, विक्रांत वार्डे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात अमित नाईक, तुलशीदास पाटील, पोलिस निरीक्षक संदेश गावंड, पत्रकार महेंद्र म्हात्रे, तंटामुक्ती समीतीचे अध्यक्ष शंकर पाटील, पोलिस कर्मचारी प्रमोद पाटील, किर्ती शहा, विकास गावंड, रमेश पाटील, सुरज ठाकूर, पद्माकर ठाकूर, संदेश पाटील, कृष्णा पाटील, मानस गावंड, संदीप गावंड, वैभव माळी, पोलिस पाटील रविंद्र पाटील, अमोल ठाकूर, उभय गावंड, सुरेश ठाकूर, सुप्रिया मोकल, चंद्रकांत म्हात्रे, सुशील ठाकूर, राजेंद्र ठाकूर, सिद्धनाथ पाटील, विक्रांत वार्डे, नितीन म्हात्रे, उदय ठाकूर, ज्योती घरत आदींचा सत्कार करण्यात आला.