नागपूरच्या काटोलमध्ये शेकापचेच वर्चस्व; समीर उमप विजयी

। नागपूर । प्रतिनिधी ।
नागपूर काटोल तालुक्यात येनवा जिल्हा परिषद मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. शेकापचे उमेदवार समीर उमप हे 2453 मतांनी विजयी झालेत.

मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून समीर उमप आघाडीवर होते. ही जागा गेल्या वेळेसही शेकापने जिंकली होती. शेकापने आपली जागा कायम ठेवली आहे. तर दुसरीकडे काटोल तालुक्यातील पारडसिंगा जिल्हा परिषद मतदारसंघात दुसर्‍या फेरीनंतर भाजप उमेदवार मीनाक्षी सरोदे विजयी झाल्या आहे. मीनाक्षी सरोदे यांनी सुमारे 1551 मतांनी विजय मिळवला आहे. गेल्या वेळेला ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली होती. आता ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिसकावून त्यावर भाजपनं वर्चस्व केलं आहे

नागपूरमध्ये निकालात बदल झाल्याची बातमी समोर येत आहे. भाजपच्या ममता जैस्वाल यांना विजयी घोषित केल्यानंतर निकाल बदलला असल्याचं वृत्त आलं आहे. दवलामोटी गणात जाहीर झालेल्या निकालात बदल झाला आहे. दवलामोटीमध्ये काँग्रेसच्या सुलोचना ढोक 10 मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपच्या ममता जैस्वाल यांना विजयी घोषित करताच भाजपनं जल्लोष करण्यास सुरुवात केली. मात्र दोन्ही उमेदवारांना पुन्हा बोलावून मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा मतमोजणी केल्यानंतर काँग्रेसच्या सुलोचना ढोक 10 मतांनी विजयी समोर आलं. या निकालानंतर काँग्रेसनं एकच जल्लोष केला आहे.

Exit mobile version