| कोल्हापूर | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. वातावरणातील बदलामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील म्हणजे चळवळीतील लढवय्ये. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दहा-बारा दिवसांच्या कोरोनासोबतच्या लढाईवरही त्यांनी तितक्याच आत्मविश्वासाने मात केली. वातावरणातील बदलामुळे त्यांची प्रकृती थोडी खालावली असून कोल्हापूरमधील ॲपल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.