थळ येथे कव्वालीचे आयोजन

। सोगाव । वार्ताहर ।

अलिबाग तालुक्यातील थळ येथील हजरत पीर काजी अली शहा बाबा (र.ह.) उरूस गुरुवार दि. 1 व शुक्रवार दि. 2 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. थळ येथील उरूस निमित्ताने 1 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता मिलाद शरीफ होणार आहे, तर दुपारी 3 वाजता संदल मिरवणूक होणार आहे, तसेच संध्याकाळी 7 वाजता संदल कार्यक्रम होणार आहे, यानंतर रात्री 8 वाजता जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच शुक्रवार दि. 2 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता प्रसिद्ध गायक, कलाकार, टिव्ही स्टार, मैफिल-ए-प्रोग्राम यांच्यात जंगी मुकाबला कव्वालकार व मशहुर फंकार अनिस नवाब यांचा ’कव्वालीचा जल्लोष’ या कार्यक्रमाचे थळ बाजार उरूस कमिटी व थळ मुस्लिम समाजातर्फे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उरूस कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहून उरूस कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, अशी विनंती थळ मुस्लिम समाजातर्फे करण्यात आली आहे.

Exit mobile version