| पनवेल | प्रतिनिधी |
घरगुती गॅस तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनत असून आज सलग सहावा दिवस नागरिकांना सकाळपासूनच रांगा लावाव्या लागत आहेत. विशेषतः गृहिणी आणि कुटुंबप्रमुखांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. गॅस सिलिंडर कधी मिळणार, याबाबत अनिश्चितता असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटत असल्याचे चित्र दिसत असून, पुरवठा विस्कळीत झाल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी पहाटेपासूनच मोठ्या रांगा लागत असून, काही ठिकाणी सिलेंडर संपल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. दरम्यान, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन नियमित आणि सुरळीत गॅस पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गॅस सिलिंडरसाठी भर उन्हात रांगा
