टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

| कोर्लई | प्रतिनिधी |

अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यातील युद्धस्थितीमुळे इंधनटंचाई निर्माण होईल की काय, या भीतीने मुरुड तालुका येथील विहूर गावातील पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. याबाबत आमच्या प्रतिनिधीने माहिती घेतली असता, प्रत्यक्षात इंधनाचा तुटवडा नसून केवळ भीतीपोटी वाहनचालक पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करत असल्याचे समोर आले. संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विहूर येथील पेट्रोल पंपावर पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version