| अलिबाग | वार्ताहर |
प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग यांचे मार्फत डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड-अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली दि. 01 डिसेंबर जागतिक एड्स दिन व पंधरवडा निमित्त बुधवार दि.13 रोजी सकाळी जिल्हा प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग येथे करण्यात आले होते.
प्रश्न मंजुषा स्पर्धे करीता 19 विदयार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. मात्र प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी 11 विद्यार्थी उपस्थीत होते. यामध्ये स्नेहल सचिन जाधव, इयत्ता 9 वी, के. एस.ओ. अलिबाग या विद्यर्थिनीने प्रथम क्रमांक व अविष्कार रविंद्र कदम इयत्ता 9 वी, डी. के. ई. टी. अलिबाग या विद्यार्थाने द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांना संजय माने जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच, इतर सहभागी विदयार्थ्यांना सहभाग नोंदविल्याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले.
स्नेहल सचिन जाधव व अविष्कार रविंद्र कदम यांची रायगड जिल्हयातून महाराष्ट्र राज्य प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. जिल्हा प्रश्न मंजुषा स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून रवींद्र कदम, रश्मी सुंकले यांनी काम पहिले.