बैलगाडा शर्यती दरम्यान राडा

दोन गटात दगडफेक आणि गोळीबार

| पनवेल | वार्ताहर |

ग्रामीण-तालुक्यातील ओवाळा गाव येथे बुधवारी (दि.13) रोजी आयोजित बैलगाडा शर्यती दरम्यान मोठा राडा झाला आहे. शर्यती दरम्यान ठाणे येथील प्रसिद्ध गाडा मालक राहुल पाटील यांचा मथुर नावाचा बैल हरल्याने दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात करण्यात आलेल्या शेरेबाजी नंतर प्रकरण चिघळल्याने दगड फेक आणि गोळीबार झाल्याचे वृत्त असून, या बाबतचा व्हिडीओ समाज माध्यमानवर व्हायरल झाला आहे. महत्वाचे म्हणजे राडा घालणारे दोन्ही कडचे हुल्लडबाज राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असल्याचे बोलले जात असल्याने पोलीस या प्रकरणावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

बुधवारी तालुक्यातील ओवळे गाव येथे आमदार हिंद केसरी पनवेल उरण, सरपंच हिंद केसरी 2024 या बैल गाडा शर्यतीच आयोजन करण्यात आले होते. या वेळी कल्याण आडवली येथील बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्या मथुरा या बैलाचा जयेश पाटील यांच्या बैलाने पराभव केल्याने भडकलेल्या समर्थकाणी हा राडा केला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान कल्याण आडीवली येथील बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यावर या पूर्वी देखील बैलगाडा शर्यतीच्या रागातून गोळीबार करण्यात आला होता तर कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारात देखील राहुल पाटील जखमी झाले होते.

Exit mobile version