शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ शंकर म्हात्रे यांना पत्नी शोक

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ शंकर म्हात्रे यांच्या पत्नी व जगन्नाथ रघुनाथ म्हात्रे यांच्या मातोश्री कै. वत्सला रघुनाथ म्हात्रे यांचे मंगळवारी (दि. 29) जे.जे. रुग्णालयात ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 80 वर्षांच्या होत्या. त्यांचे दशक्रिया गुरुवारी (दि.8) व उत्तरकार्य रविवारी (दि.11) रोजी त्यांच्या राहत्या घरी बहिरिचा पाडा, हाशिवरे ता. अलिबाग येथे होणार आहे. त्यांच्या पश्‍चात 4 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Exit mobile version