| अलिबाग | प्रतिनिधी |
नारंगी गावातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावान कार्यकर्ते नरहरी म्हात्रे यांचे 12 जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रविवारी (दि. 19) शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी नारंगी येथे जाऊन म्हात्रे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.
यावेळी जयंत पाटील यांनी नरहरी म्हात्रे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. तसेच दुःखाच्या प्रसंगी कुटुंबियांना धीर देत पक्ष त्यांच्या पाठीशी कायम उभा राहील, अशी भावना व्यक्त केली. यावेळी अनिल गोमा पाटील, अमोल पाटील, अनिल धुमाळ, श्री. वाघमोडे, आपणकर काका, निखिल म्हात्रे, दीपक म्हात्रे तसेच नारंगी गावातील ग्रामस्थ, शेकापचे कार्यकर्ते आणि म्हात्रे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.







