| मुंबई | वृत्तसंस्था |
महागाई आणि ईडीच्या कारवायांच्याविरोधात काँग्रेसनं काल देशव्यापी निषेध आंदोलनं केली. यावेळी काळे कपडे परिधान करुन काँग्रेसनं सूचकपद्धतीनं केंद्रातील भाजप सरकारचा निषेध नोंदवला. पण या आंदोलनप्रकरणी काँग्रेस नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यापार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
काँग्रेसच्या निषेध आंदोलनप्रकरणी त्यांच्या नेत्यांवर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यापार्श्वभूमीवर खासदार राहुल गांधी म्हणाले, “आपल्या देशात आता निषेध नोंदवणं, आपली मतं मांडणं बेकायदा आहे. पण त्यांच्यासाठी (भाजप) काहीही करण्यासाठी सूट आहे”.