| विदर्भ | वृत्तसंस्था |
विदर्भात दुसऱ्या टप्प्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 19 एप्रिलला वर्ध्यात आले. वर्धा आणि अमरावती लोकसभेतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान पुन्हा विदर्भवारी करणार आहेत. वर्ध्याच्या तळेगाव येथील श्यामजीपंत येथील प्रगती मैदानावरच्या 32 एकर जागेत या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महायुतीच्या वतीने या सभेसाठी मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात आली आहे. असे असताना यवतमाळ येथे घडलेल्या प्रकार आज वर्ध्यात देखील घडल्याने या सभेची चांगलीच चर्चा होताना दिसतेय. पंतप्रधानांच्या सभेस्थळी ठेवण्यात आलेल्या खुर्च्यांवर काँग्रेसनेते राहुल गांधीचा फोटो असलेल्या जाहिरातींचे स्टिकर्स लावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, हा प्रकार यापूर्वी घडलेल्या यवतमाळमधील सभेप्रमाणेच तर नाही ना, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
पंतप्रधान मोदींच्या खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स
