। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होणार असून, ते आज दाखल झाले आहेत. तत्पूर्वी ट्रायल म्हणून विमानाचे लॅंडींग यशस्वी करण्यात आले आणि ते यशस्वी ठरले आहे. या विमानतळावर सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांचे विमान उतरले. या विमानाला अग्निशमन दलाकडून पाण्याची सलामी देण्यात आली. तसेच मोदी आल्यानंतर टर्मिनल इमारत आणि एकूण प्रकल्पाची माहिती जाणून घेतील. त्यानंतर नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होणार आहे.







