मुंबई | प्रतिनिधी |
काँग्रेसच्या 137 व्या स्थापना दिनानिमित्त शिवाजी पार्कवर मंगळवारी (28 डिसेंबर) काँग्रेस नेेते राहुल गांधी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने हा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती माहीत भाई जगताप यांनी दिली. े राज्य सरकारने जाहीर केलेल्या सूचनांचे पालन करीत काँग्रेसचा वर्धापनदिन साजरा केला जाईल. आता हा कार्यक्रम तेजपाल ऑडिटोरीयममध्ये होणार असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले. तसेच राहुल गांधी यांच्या मेळाव्याची पुढची तारीख लवकरच कळवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राहुल गांधी यांचा मेळावा स्थगित
