। मुंबई । दिलीप जाधव ।
राजकीय रणधुमाळीत विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झालेले अॅड.राहूल नार्वेकर हे चोंढी,ता.अलिबागचे सुपूत्र असून, त्यांच्या रुपाने विधीमंडळाच्या सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी त्यांना लाभणार आहे.
राहुल नार्वेकर यांची शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.तीन वर्ष राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य म्हणून काम केले.राजकीय वर्तुळात विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादी कोंग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकरांचे जावई म्हणून त्यांची ओळख आहे. नार्वेकर यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकी पूर्वी भाजप पक्षात प्रवेश केला . मुंबईतील कुलाबा मतदार संघातून भाजप ने आमदारकीचे तिकिट दिले तेव्हा भाजप मध्ये अंतर्गत नाराजी दिसून आली होती .मात्र त्यांनी कोंग्रेस च्या भाई जगताप यांचा पराभव करून नार्वेकर यांनी भाजप मधल्या विरोधकांचे तोंड बंद केले . 2014 साली राष्ट्रवादी कोंग्रेस तर्फे मावळ लोकसभा मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती .
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 15 वर्षे उच्च न्यायालयात वकीली केली आहे . त्यांना 2015 /16 सालचा राष्ट्रकुल संसदे चा उत्कृष्ठ संसदपट्टू म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ,काँग्रेसचे बाळासाहेब थोरात , माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले ,हरीभाऊ बागड़े , समाजवादी नेते आबू आझमी , शिवसेना नेते आदित्य ठाकरे , सुधीर मुंनगंटीवार ,दीपक केसरकर आदि नेत्यांनी नव निर्वाचित अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर यांच्या बाबत गौरवोदगार काढले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. विधानसभा अध्यक्ष पदा सारख्या सर्वोच्च पदा वर बसण्याचा मला मान दिल्या बद्द्ल राहुल नार्वेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह,भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे आभार मानले.
नाहीतर मुलीकडे तक्रार करु
राष्ट्रवादी नेते रामराजे निंबाळकर यांचे राहुल नार्वेकर हे जावई असल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील म्हणाले की, अध्यक्ष महाराज तुम्ही आमचे जावई आहात, तेव्हा आमच्या बाजूला जास्त लक्ष द्या, नाहीतर आमच्या मुलीला सांगावे लागेल. त्या तुमचा संध्याकाळी घरी गेल्यावर समाचार घेतील.यावर सभागृहात एकच हंशा पिकला.यावर अध्यक्ष म्हणाले की मी जावई आहे ते बरोबर आहे ,पण तुम्ही जावयाची काळजी घेतली पाहिज,असे प्रत्युत्तर दिले.
राज्यातील शेतकर्यांचे,समाजहिताचे प्रश्न सोडविण्यासाठी मी चोवीस तास उपलब्ध असणार आहे.जनतेला न्याय देणार्या कायद्याच्या दुरुस्ती साठी चर्चेत सहभागी होईन.तसेच कुठले हि विधेयक चर्चे विना मंजूर होणार नाही याकडे लक्ष देईन.
अॅड. राहुल नार्वेकर,विधानसभा अध्यक्ष