| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठण्याजवळील वाकण नाक्यालगतच्या पाटणसई स्टॉपवरील एका टपरीवजा दुकानात सुरू असलेल्या मटका मटका अड्ड्यावर धाड टाकून सुमारे 5 हजरी 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही धडक कारवाई नागोठणे पोलीसांनी शुक्रवार दि.30 ऑक्टोबर रोजी केली. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत बाळसई येथील टपरी चालक व विनापरवाना मटका चालविणारा परशुराम तेलंगेसह मटका खेळणाऱ्या अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मोबाईल व्हॉट्स ॲप द्वारे चोरीछुपे मटका खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईदरम्यान, दुकान चालक परशुराम तेलंगेकडून 930 रुपये रोख रक्कम, 5 हजार रुपये किंमतीच्या मोबाईलसह इतर वस्तू असा एकूण 5 हजार 950 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून जप्त करण्यात आला. या सर्व साहित्याचा वापर करून परशुराम तेलंगे कल्याण ओपन नावाचा मटका जुगार चालवित होता. यावेळी दोघेजण कल्याण ओपन नावाचा मटका जुगार मोबाईल व्हॉटस्ॲप मेसेजद्वारे खेळताना सापडले. त्यामुळे या तिघांविरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटणसई येथील मटका अड्ड्यावर छापा
