मुरुड पोलिसांची कारवाई
। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
बेकायदेशीररित्या गांजा विक्रेत्यावर मुरुड पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई बुधवारी (दि.1) सायंकाळी करण्यात आली असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुरुडमध्ये विखू नावाच्या व्यक्तीकडे गांजा सापडला मुरुड पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपासाचे सूत्रे वेगात हलवण्यात आली. पोलीसी दणक्याने अटक केलेला आरोपी पोपटासारखा सरळ बोलू लागला.
रेवदंडा येथील आशिष तळेकर या व्यक्तीकडून त्याने गांजा घेतल्याचे कबूल केले. अखेर मुरुड पोलिसांच्या पथक सायंकाळी रेवदंडामध्ये दाखल झाले. छाप्यामध्ये आशिष याच्याकडे गांजाचा साठा आढळून आला. याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.या कारवाईने रेवदंडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रेवदंडामध्ये गुटखा व इतर अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढल्याचे या घटनेनुसार स्पष्ट होत आहे. आशिष हा हा व्यक्ती गांजा तस्करीचा मोठा व्यापारी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता पोलीस त्याच्या विरोधात कठोर कारवाई करणार का याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
