| अहमदनगर | वृत्तसंस्था |
कृष्णा नदीच्या काठावर काही जण जुगार खेळत असताना पोलिसांनी मंगळवारी (दि.२) सायंकाळी छापा टाकला. यावेळी पोलिसांना घाबरून काही तरणांनी पळ काढला. पण पळ काढताना गोलाकार बोटीत बसून जाणारे सहा जण बुडून मृत्यू पावले तर दोघे जण पोहून आल्याने वाचले. विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील जुने बळोती येथे ही घटना घडली.
जुगार खेळत असताना पोलिसांनी अचानक छापा टाकल्याने आठ जणांनी गोलाकार बोटीतून पळ काढला. पण नदीच्या भोवऱ्यात सापडल्याने बोट कलंडली आणि सहा जणांना नदीत बुडून आपला जीव गमावला लागला. कोल्हार शहरातील रहिवासी महबूब वालीकार (30), तयब चौधरी (42), रफिक जालगार उर्फ बांदे (55), पुंडलिक मल्लाप्पा यंकंची (36), दशरथ गौडर सूळीभावी (66) असे मयत झालेल्या दुर्दैवी व्यक्तींची नावे आहेत. तर आणखीन एका मयत व्यक्तीची ओळख पटलेली नाही.
अग्निशमन दल व स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे कार्य हाती घेण्यात आले. या घटनेनंतर घटनास्थळी शेकडो लोकांनी गर्दी केली. रात्र झाल्याने मृतदेहाचा शोध घेण्यासाठी अडचणी आल्या. या घटनेची माहिती मिळताच साखर मंत्री व बसवन बागेवाडीचे आमदार शिवानंद पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.