ठाण्यातील हातभट्टी अड्डयांवर धाड

। ठाणे । प्रतिनिधी ।

ठाण्यातील खाडी किनारी सुरु असलेल्या गावठी दारु निर्मितीच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे पथकांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत गावठी दारु निर्मितीसाठी लागणार्‍या रसायनासह 13 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष मोहिमेंतर्गत खाडी किनारी असलेल्या अड्डयांवर 31 ऑगस्ट रोजी धाडसत्र राबवून कारवाई करण्यात आली. हातभट्टीद्वारे तयार होणार्‍या गावठी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी विशेष धाडसत्र मोहीम सुरु केली आहे. याच अनुषंगाने अधीक्षक प्रविण तांबे यांच्यासह उप अधीक्षक वैभव वैद्य, अभिजित देशमुख, तसेच निरीक्षक महेश धनशेट्टी, संजय ढेरे, आनंद पवार आणि दीपक परब आदींच्या पथकांनी वडवली, आगासन, अंबरनाथ, उंबरडे, वसावली, अंजुर, आलिमघर आणि देसाई गावासह इतर ठिकाणच्या खाड़ी आणि अति दुर्गम भागात जाऊन शनिवारी दिवसभर ही कारवाई केली आहे.

Exit mobile version