पॉवरलिफ्टिंगमध्ये रायगडचे ‌‘चंदेरी’ यश

| मुंबई | प्रतिनिधी |

इंदूर-मध्यप्रदेश येथे दि.19 ते 21 डिसेंबर या कालावधीत पश्चिम भारत विभागीय क्लासिक राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धा पार पडली. यामध्ये महाराष्ट्राच्या संघातून रायगडचे 3 खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनिअर स्पर्धा झाली. यावेळी ज्युनिअर मुलींमध्ये 43 किलो वजनी गटात अलिबाग तालुक्यातील वाडगांव येथील सार्वजनिक व्यायाम शाळेची सुहानी गावडे हिने 167.5 किलो वजन स्कॉट, बेंचप्रेस आणि डेडलिफ्ट या प्रकारात रौप्यपदक पटकावले. 47 किलो वजनी गटात खोपोली पॉवर हाऊस क्लबची तथा रायगडची आंतरराष्ट्रीय खेळाडू अमृता भगत हिने 305 किलो वजन स्कॉट, बेंचप्रेस आणि डेडलिफ्ट यामध्ये रौप्यपदक जिंकले. तर, मुलांच्या 83 किलो वजनी गटात पेणच्या संसारे फिटनेसच्या अथर्व लोधी याने देखील 642.5 किलो वजन स्कॉट बेंचप्रेस आणि डेडलिफ्ट या प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे.

Exit mobile version